जालना: एमआयडीसीत वाहनचालकांचे मोबाईल चोरणारा जेरबंद; 50 हजारांचे 5 मोबाईल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna, Jalna | Apr 13, 2026 एमआयडीसी परिसरात वाहनचालकांचे मोबाईल चोरी करणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. सोमवार दि.13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडून सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.जालना जिल्ह्यात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पथक तयार करून संशयितांचा शोध सुरू केला.