इगतपुरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ह्याच्यात पुण्यातील ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
इगतपुरीत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” आरोग्य शिबिराचे आयोजन इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरएमओ डॉ. सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत *“स्वस्थ नारी – सशक्त परिवार शिबिर”* पार पडले.