रोटावेटरमध्ये अडकल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथे घडली. बाळनाथ पुंजाबा रोहोम वय ६० असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहोम हे आज सोमवार दि.५ रोजी दुपारी १-०० वाजे दरम्यान आपल्या खिर्डी गणेश शिवारातील टाकळी फाटा येथील शेतात रोटावेटरने शेत जमीन तयार करीत होते. रोटावेटरमध्ये गबाळ अडकल्याने ते काढीत असताना साहेबराव रोहोम हे रोटावेटरमध्ये ओढले गेले.त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.