वर्ष संपण्याच्या आणि नवीन वर्षारंभाच्या निमित्ताने समाज माध्यमांतून ‘तुका म्हणे’ सारख्या शब्दांचा वापर करून संतांचा अवमान कटाक्षाने टाळण्यात यावा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वारकरी आचारसंहिता परिषदेचे पूर्व महाराष्ट्र प्रमुख गोपाल महाराज पितळे (मेहकर) यांनी दिला आहे. जुने वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होताना दरवर्षी ३१ डिसेंबरला समाज माध्यमांतून शुभेच्छा देण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या संदेशांचा भडीमार होत असतो. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप यांसारख्या माध्यमांमधून मनोरंजक मीम्स आणि टवाळखोर संदेश प्रसारित केल्या जातात. त्यामध्ये कधीकधी टवाळीच्या उद्देशाने ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर करून विचित्र अर्थाच्या ओळी रचल्या जातात. दरवर्षी वर्षान्ताच्या वेळी असे प्रकार कमी