अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवर आधारित आहे. मतदार यादी कार्यक्रमानुसार तयार करण्यात आलेली ही अंतिम यादी, ३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती सायंकाळी ६ वाजता जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली.