वर्धा: उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारी:जिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी
Wardha, Wardha | Sep 18, 2025 उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत जिल्ह्यात रविवार दि.21 सप्टेंबर रोजी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या निरक्षर व्यक्तींनी आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.