केज: इस्थळ येथील आरोग्य उपकेंद्राचा एक लाख 16 हजाराचा निधी हडप केला, वैद्यकीय अधिकाऱ्यासह तिघांवर युसुफ वडगाव ठाण्यात गुन्हा
Kaij, Beed | Oct 31, 2025 सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेतच मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील इस्थळ येथील आरोग्य उपकेंद्राच्या बळकटीकरणासाठी मंजूर झालेला १ लाख १६ हजार ६९४ चा निधी अधिकार नसताना परस्पर उचलल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केलेल्या सखोल चौकशीत उघड झाले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.