चांदूर बाजार: मोर्शी चांदूरबाजार मार्गावर रिद्धपूर जवळ आयशर ट्रक चा अपघात, सुदैवाने जीवित हानी नाही
आज दिनांक पाच नोव्हेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी चांदूरबाजार मार्गावरील रिद्धपूर जवळ असलेल्या पेट्रोल पंपा समोर, नागपूर वरून परतवाड्याकडे इलेक्ट्रिक साहित्य घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकचा, रिद्धपूर जवळील पेट्रोल पंपाजवळ अपघात झाल्याची घटना दिनांक चार नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घडली आहे. दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात जीवितहानी नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे