सातारा: मेढा - कोंडवे रस्त्यावरील पडलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे सैदापूर ग्रामपंचायतीला निवेदन
Satara, Satara | Sep 16, 2025 मेढा - कोंडवे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे, या कचऱ्यातूनच नागरिकांना ये जा करावी लागत आहे, सध्या पडत असल्या पावसामुळे हा कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे या परिसरात रोगराई पसरू शकते, तरी येथील कचऱ्याची स्वच्छता सैदापूर ग्रामपंचायतीने तातडीने करण्याबाबत उद्धव सेना युवक उपजिल्हाप्रमुख, सागर धोत्रे यांनी आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे.