पुसद : श्रीरामपूर येथील जगदंबा मंदिराजवळ किरकोळ वादातून तिघांनी एका युवकावर चाकूहल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली. प्रद्युम अरुण राठोड यांनी वसंतनगर पोलिस ठाण्यात तन्मय पवार व दोन अनोळखी इसमांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.