नागपूर ग्रामीण: : नागपुरात ८ फूट लांब महाकाय नागाचा थरार; सर्पमित्राने वाचवले प्राण
: बेसा रोडवरील वृंदावन कॉलनी येथे शनिवारी दुपारी एका ८ फूट लांब महाकाय नागामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मोक्षलता कांबळी यांच्या घराच्या आवारात अचानक हा नाग आला आणि त्यांच्या पायावरून जात थेट वॉशिंग मशीनमागे जाऊन लपला.या धक्कादायक प्रकारामुळे कुटुंबीय प्रचंड घाबरले होते.