पूर्व मंगळवार पेठ क्षेत्रीय गल्ली सॅमसंग टेलर दुकानासमोर हँडल लॉक करून ठेवलेली दुचाकी क्रमांक एम.एच.१३.सी.व्ही.६४६३ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.ही घटना ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिद्धाराम शिवप्पा गुळदे (वय-५५,रा.पूर्व मंगळवार पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आरेनवरु करीत आहेत.