भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव (नेरला) येथील शेतकरी हेमंत घनश्याम बुराडे (२९) यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी ४ पोते धान चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून, यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. प्राप्त माहितीनुसार, दि. १४ डिसेंबरच्या सायंकाळी ५ ते १५ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, फिर्यादीच्या शेतात चुरण करून ठेवलेले 'श्री १०१' या जातीचे प्रत्येकी एक क्विंटल वजनाचे ४ बारीक धानाचे पोते (अंदाजे किंमत ८,००० रुपये) अज्ञात आरोपीने पळवून नेले. शेतात साठवून ठेवलेला माल चोरीला गेल्याचे.