चोपडा: सानेगुरुजी वसाहत भागात पंकज ओतारी यांच्या घरासमोर लाइटिंग टाकण्यावरून वाद,एकाला तिघांची मारहाण,चोपडा पोलिसात गुन्हा
Chopda, Jalgaon | Sep 22, 2025 चोपडा शहरात साने गुरुजी वसाहत आहे. या भागात पंकज ओतारी हे राहतात. त्यांच्या घरासमोर लाइटिंग टाकण्यावरून वाद झाला या वादातून शिवाजी भोई वय ३९ या तरुणाला आकाश भोई, भुषण भोई व संतोष भोई यांनी मारहाण केली. फायटरने मारून दुखापत केली. तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे