जळगाव: सुप्रीम कॉलनी जवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुण जखमी; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
सुप्रीम कॉलनी परिसरातील रक्षदा हार्डवेअरजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका मोटारसायकलने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका प्लंबरला जोरदार धडक दिली. या अपघातात प्लंबरच्या उजव्या पायाच्या पंजाला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मंगळवार 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.