अलिबाग: अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी
Alibag, Raigad | Nov 7, 2025 खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) तर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून युवकांना रोजगारक्षम बनविणे आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या अंतर्गत 10 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून उमेदवारांना नागरिक उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन पायलट परवाना मिळणार असून, कृषी, सर्वेक्षण, छायाचित्रण, चित्रफितनिर्मिती, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, शेतीमध्ये फवारणी व तपासणी अशा विविध क्षेत्रांत रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या दिशा खुल्या होतील.