परभणी: बंजारा व वंजारी समाज पूर्णपणे वेगळे भाषा व संस्कृती वेगवेगळी आमदार तुषार राठोड यांची उपोषण मैदानात प्रतिक्रिया
बंजारा समाजास हैदराबाद गॅजेट नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन मैदानात 11 सप्टेंबर पासून उपोषणकर्ते दशरथ प्रभाकर राठोड यांनी सुरू केलेल्या उपोषणास आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता आमदार तुषार राठोड यांनी भेट दिली. यावेळी आमदार राठोड यांनी बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिलं, तसेच बंजारा व वंजारी समाज पूर्णपणे वेगळे भाषा व संस्कृती वेगवेगळी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.