नागलवाडी येथील 'संगम गॅस एजन्सी' दुपारी १२ वाजता उघडली जात असल्याने, भर उन्हात शेकडो ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. नियमानुसार ग्राहकांना घरपोच सिलेंडर मिळणे अपेक्षित असताना, एजन्सीकडून तसे न करता ग्राहकांना स्वतः येण्यास भाग पाडले जात आहे.