भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर महामार्गावरील भिलेवाडा उडान पुलावर ट्रेलर व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज दि. 17 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 7.30 वा. दरम्यान घडली आहे. यात दोघेजण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपक भगवान उके वय 34 व ट्रॅक्टर चालक अंकुश शंकर ढेंगे वय 32 दोन्ही रा. सुरेवाडा हे ट्रॅक्टर क्रमांक MH 36 AL 8771 ने भंडाऱ्याकडून सूरेवाड्याला जात असता त्याच दिशेने येणाऱ्या ट्रेलर क्रमांक NL 01 AC 6130 ने भिलेवाडा उडान पुलावर मागेहून जबर धडक दिली.