औसा: माकणी धरणाची दोन द्वारे उघडी; तेरणा नदीपात्रात नियंत्रित विसर्ग सुरू
Ausa, Latur | Oct 30, 2025 औसा -निम्न तेरणा प्रकल्प माकणी येथे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढत्या येवाचा विचार करून आज सकाळी 6.15 वाजता दोन द्वारे उघडण्यात आली आहेत. या अंतर्गत तेरणा नदीपात्रात एकूण 767 क्यूसेक्स (21.71 क्यूमेक्स) इतका नियंत्रित विसर्ग करण्यात येत आहे.सद्यस्थितीत दोन्ही वक्रद्वारे प्रत्येकी 10 सेंमी नी उघडण्यात आली असून पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग वाढविणे किंवा कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे,