आई मथुरा येथे तीर्थयात्रेसाठी तर वडील परिसरातील मंदिरात गेलेले असताना खुशी ज्ञानेश्वर पिसे (वय १९, रा. दौलतनगर) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली