हिंगोली: जिल्हा न्यायालय येथे सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा हिंगोली वकील संघाचा तीव्र निषेध
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालय कक्षात झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध हिंगोली वकील संघाच्या वतीने आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी बारा वाजता दरम्यान करण्यात आला. वकील संघाने यावेळी निषेध व्यक्त करत स्पष्टपणे सांगितले की, अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.