सातारा: भारतीय सैन्य दलात क्लार्क पदावर जॉब लावतो असे सांगून, नेले येथील युवकाची 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक
Satara, Satara | Sep 20, 2025 भारतीय सैन्य दलामध्ये, क्लार्क पदावर जॉब लावतो असे सांगून, नेले पोस्ट किडगाव, तालुका सातारा येथील एका युवकाची, 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, कराड येथील प्रदीप विठ्ठल काळे याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे, याबाबत सातारा तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 3 जून 2024 ते दिनांक 8 सप्टेंबर 2024 पर्यंत, रितेश नितीन जाधव वय 21 वर्षे, राहणार नेले पोस्ट किडगाव, तालुका, जिल्हा सातारा या युवकाची फसवणूक केली.