अकोला: अकोला महापालिकेची आरक्षण सोडत प्रमिलाताई ओक सभागृहात जाहीर, शहरात राजकीय तापमान वाढलं!
Akola, Akola | Nov 11, 2025 अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रमिलाताई ओक सभागृहात काढण्यात आली. एकूण ८० जागांपैकी ४३ सर्वसाधारण, १४ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती व २१ ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठरल्या आहेत. या सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. संभाव्य उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला असून तिकीटासाठी पक्षश्रेष्ठींकडे हालचाली सुरू झाल्या आहेत.