नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथे "नाथांच्या नावानं चांगभल"चा गजर करत पौष रविवार च्या निमित्ताने दिवसभरात जिल्ह्यासह राज्यातील भाविकांनी श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेतले.यावेळी नाथांच्या नावानं चांगभलं चा गजराने श्री क्षेत्र बहिरवाडी दुमदुमली होती.परिसरात विविध दुकाने थाटण्यात आल्याने येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.