तेल्हारा: तेल्हारा तालुक्यातील सात जागांचे आरक्षण जाहीर; अध्यक्षपदावर पुन्हा दावा मजबूत
Telhara, Akola | Oct 13, 2025 अकोला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तेल्हारा तालुक्यातील सात गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे. दानापुर गट सर्वसाधारण महिलांसाठी, अडगाव बु अनुसूचित जमातीसाठी, तर सिरसोली सर्वसाधारणसाठी राखीव ठरला आहे. बेलखेड, पाथर्डी आणि दहिगाव हे गट सर्वसाधारण महिला, तर भांबेरी गट सर्वसाधारण म्हणून घोषित झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला साठी राखीव आहे त्यामुळे पुन्हा अध्यक्ष तेल्हारा तालुक्यातील होतो का हे सुद्धा पाहुणे महत्त्वाचे आहे