नागपूर शहर: नागपुरात पावसाची दमदार बॅटिंग, अवघ्या काही तासाच्या पाण्यात नागपुरातील रस्ते बनले स्विमिंग पूल
हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार नागपूर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून ऊनसावल्याच्या खेळ सुरू होता. दरम्यान ढगांच्या गडगडाटासह मेघ बरसले व नागरिकांची एकच तारांबळ उडाली. काही वेळातच हा पाऊस थांबला देखील परंतु अवघ्या एक ते दोन तासाच्या पावसात नागपुरातील रस्ते मात्र स्विमिंग पूल बनले आणि महानगरपालिकेची पोलखोल झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना येजा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला.