आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात जागतिक हिवताप दिन झाला साजरा...
385 views | Ratnagiri, Maharashtra | Apr 25, 2025 रत्नागिरी : जागतिक हिवताप दिन" हा दिनांक २५ एप्रिलला दर वर्षी साजरा करण्यात येतो. हिवतापा सारख्या किटकजन्य आजाराबद्दल आणि त्याच्या प्रतिबंधाबद्दल जनतेमध्ये जागरूकता वाढवणे व जनतेचा सहभाग घेऊन त्यावर उपाययोजना करणे यासाठी दरवर्षी 25 एप्रिल रोजी “जागतिक हिवताप दिन” साजरा केला जातो. या वर्षाचे घोषवाक्य आहे -" 𝐌𝐚𝐥𝐚𝐫𝐢𝐚 𝐄𝐧𝐝𝐬 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬: 𝐑𝐞𝐢𝐧𝐯𝐞𝐬𝐭, 𝐑𝐞𝐢𝐦𝐚𝐠𝐢𝐧𝐞, 𝐑𝐞𝐢𝐠𝐧𝐢𝐭𝐞 "“ चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा " मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.