चोपडा: नागलवाडी येथे रस्त्यावर पाणी फेकलेच्या कारणावरून वाद, महिला व तिच्या मुलास तिघांची मारहाण, चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 16, 2025 चोपडा तालुक्यात नागलवाडी हे गाव आहे. येथे रस्त्यावर पाणी फेकल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून रेखाबाई पाटील व त्यांचा मुलगा अतुल पाटील या दोघांना दिलीप पाटील, नितीन पाटील व कल्पना पाटील यांनी मारहाण केली तसेच दोघांना आमच्या नादी लागले तर मारून टाकू अशी धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.