जालना: तीर्थपुरीत जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; 32 आरोपी ताब्यात, 42 लाखांचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | Apr 24, 2026 तीर्थपुरी येथील भायगव्हाण शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि तीर्थपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. शुक्रवार दि. 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत जुगार चालकासह 32 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 42 लाख 43 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात जुगार खेळणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिल्या होत्या.