30 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत कमलेश सोमकुवर हे एकामेकाण्याच्या बाहेरील भिंतीला पहिल्या माळ्यावर झुल्यावरून पेंटिंग करीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता मिळून हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकारणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून पोलीस स्टेशन मानकापूर येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.