जळगाव जामोद: सुनगाव ते जळगाव रोडवर कंटेनर पडले पुलाच्या खाली, चालक वाहक गंभीर जखमी
तालुक्यातील सुनगाव ते जळगाव रोडवर कापसाच्या गाठीने भरलेले कंटेनर पुलाच्या खाली पडले त्यामुळे कंटेनरच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन यातील चालक वाहक गंभीर स्वरूपात जखमी झाले. प्राथमिक उपचारार्थ त्यांना जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले व पुढील उपचारार्थ त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.