भंडारा येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखालील 'अभ्यागतांच्या भेटी' या उपक्रमाला दिनांक 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी आपल्या विविध समस्या, तक्रारी आणि सूचना थेट फुके यांच्यासमोर मांडल्या. या भेटीदरम्यान, प्रत्येक विषय गांभीर्याने ऐकून त्याची योग्य नोंद घेण्यात आली, तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी संबंधित शासकीय विभागांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्य