अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काळवीट तलावात गुरुवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी विश्वनाथ बुरांडे (वय ६४) हे नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी तलावात उतरले असता ते पाण्यात बुडाले, बराच वेळ लोटूनही ते पाण्याबाहेर न आल्याने नागरिकांनी प्रशासनाला माहिती दिली. घटनेनंतर अग्निशमन दल व पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बीड येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले, पाण्यात कॅमेरे लावून शोधमोहीम सुरू आह