भद्रावती: स्वागत सेलिब्रेशन सभागृहात रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा सदस्य मेळावा.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचीत्य साधुन शहरातील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा सदस्य मेळावा स्थानिक स्वागत सेलिब्रेशन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक जे.के.ठाकुर यांच्या हस्ते पार पडले.यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अड.देविदास काळे व इतर मान्यवर ऊपस्थीत होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सहकाराचे महत्व व संस्थेच्या कार्याचे महत्व विषद केले.मेळाव्याला पतसंस्थेचे पदाधिकारी, सदस्य, अभिकर्ते तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत.