जळगाव: आदर्श नगरातील इंडस टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील आदर्श नगरातील टॉवरमध्ये बसलेल्या ४५ हजार रुपये किंमतीच्या २४ बॅटरी चोरुन नेल्या. ही घटना २० ऑगस्ट रोजी तपासणीसाठी गेलेल्या सुपरवायझरच्या लक्षात आली. याप्रकरणी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.