भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे जनजातीय गौरव दिन व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियोजनभवनात झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये राष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन झाले असून त्याचे थेट प्रक्षेपण येथे दाखविण्यात आले. कार्यक्रमाला आमदार वसंत खंडेलवाल, प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांची उपस्थिती होती. बिरसा मुंडा प्रतिमापूजन, चित्रप्रदर्शन व आश्रमशाळेतील विद्यार