जालना: जालना शहरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे जालना सेवादल अध्यक्ष शेख इब्राहिम व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार
Jalna, Jalna | May 31, 2026 जालना शहरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि महानगराध्यक्ष डॉ. विशाल धनुरे यांचे आगमन होताच जालना सेवादल अध्यक्ष शेख इब्राहिम व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासह आगामी राजकीय आणि सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कल्याण दळे आणि डॉ. विशाल धनुरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाची भूमिका, संघटन विस्ताराचे नियोजन तसेच आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. स्वागत समारंभात सेवादला