सडक अर्जुनी: केशोरी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन ग्रामपंचायत भवन बांधकामाचे भूमिपूजन
केशोरी येथे नवीन ग्रामपंचायत भवन बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.नवीन ग्रामपंचायत भवन उभारल्यामुळे ग्रामविकासाशी संबंधित सर्व कामकाज अधिक सुलभ व प्रभावी होणार आहे.असे याप्रसंगी लायकराम भेंडारकर म्हणाले. याप्रसंगी श्रीकांत घाटबांधे जिल्हा परिषद सदस्य,जयश्री देशमुख जिल्हा परिषद सदस्य,नंदकुमार गहाणे सरपंच,रामकृष्ण बनकर उपसरपंच,अनिल लाडे तंटा मुक्ती अध्यक्ष,वासुदेव मडावी,ज्योतीताई गहाणे, आदी मान्यवर उपस्थित होते