जळगाव तालुक्यातील कटोरा गावातून एक व्यापारी त्यांच्या दुचाकीसह बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रविंद्र नारायण पाटील (वय ३६) असे बेपत्ता झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते कोणालाही काहीही न सांगता अचानक घरून निघून गेले आहेत. त्यांच्या पत्नीने सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये पती हरवल्याची नोंद केली आहे.