सेनगाव: लिंबाळा तांडा चौफुलीवरील संत सेवालाल महाराजांच्या झेंड्याचे अज्ञात वाहनाच्या धडकीने नुकसान, पोलिसांकडून पंचनामा
सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा येथील चौफुलीवर असलेला संत सेवालाल महाराजांच्या झेंड्याचे अज्ञात वाहनाच्या धडकेने नुकसान झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे निषेध नोंदविण्यात येत आहे़. अज्ञात वाहनाच्या धडकेत सदरचा हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सदरची घटना घडली.