खामगाव: खामगाव शहर व खामगाव तालुक्यात जोरदार पाऊस
आज पर्यंत एकूण ५०८.६ मिमी पावसाची खामगाव बाजार समितीमध्ये नोंद
१६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजे पासून खामगाव शहर व खामगाव तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून विजांच्या कडकडासह खामगाव शहर व खामगाव तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे खामगाव शहरातील नाल्यांना मोठा पूर आला असून तसेच काही दुकानांमध्ये व घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान सुद्धा झाले.तसेच नाल्या मधील पाणी हे रस्त्यावर आल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आज दिनांक १६ सप्टेंबर सकाळी ८ वाजे पर्यंत २.६ अशी नोंद असून आज पर्यंत ५०८.६ मिमी आहे.