सातारा: खड्डे बुजवण्यासाठी वासुदेवाचे खड्ड्यात उतरून प्रशासनाला प्रबोधन,डेमोक्रॅटिक पार्टीचे खड्ड्यांच्या निषेधार्थ आंदोलन
Satara, Satara | Sep 18, 2025 सातारा शहरातील भल्या मोठ्या महाकाय खड्ड्यांच्या निषेधार्थ विविध संघटनांमार्फत अनेक आंदोलन करण्यात आले मात्र शहरात तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये भल्या मोठ्या खड्यांमध्ये एक लक्षवेधी आंदोलन डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने करण्यात आले या आंदोलनामध्ये वासुदेवांने खड्ड्यामध्ये उतरून खड्डे बुजवण्यासाठी प्रशिक्षणाला प्रबोधन केले तर, लहान मुलांच्या भूमिकेत खड्ड्यानभोवती संगीत म्हणून तसेच महिलांनी फुगडी खेळ करून बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध करण्यात आला.