धुळे: आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेलाजोडे मारुन नविन महापालिका चौकात एनसीपी शरदचंद्र पवार गट वतीने करण्यात आला जाहिर निषेध
Dhule, Dhule | Sep 19, 2025 धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील आणि स्वर्गीय राजारामबापू यांचे विरुद्ध केलेल्या बेताल वक्तव्याचा 19 सप्टेंबर शुक्रवारी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान साक्री रोड नवीन महापालिका चौकात एनसीपी शरदचंद्र पवार गट जिल्हाध्यक्ष रंजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वात जोरदारपणे घोषणाबाजी करत आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोडे मारत गोपीचंद पडळकर यांचा निषेध असो अशा घोषणा याप्रसंगी दिल्य