बल्लारपूर: बल्लारपूर येथे डॉक्टर आदर्शकुमार कणकम यांच्या रुग्णालयाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन
बल्लारपूर येथे डॉ. आदर्श कुमार कनकम यांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले. स्थानिक नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने उभारलेले हे केंद्र आता लोकांच्या आरोग्यसंवर्धनाचे आणि उपचारसेवेचे नवे केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. डॉ. आदर्श व डॉ. सुविधा फुलझेले कनकम या दोघांनाही पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.