अंबड: धुळे–सोलापूर महामार्गावर उद्या शेतकऱ्यांचा भव्य रस्ता रोको! — दुणगाव फाटा ठरेल आंदोलनाचे केंद्रबिंदू
जालना जिल्ह्यास
Ambad, Jalna | Oct 11, 2025 *धुळे–सोलापूर महामार्गावर उद्या शेतकऱ्यांचा भव्य रस्ता रोको! — दुणगाव फाटा ठरेल आंदोलनाचे केंद्रबिंदू* जालना जिल्ह्यासह अंबड आणि घनसावंगी तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतपिकांचे, विहिरींचे, तलावांचे आणि शेतीमातीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने केवळ तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड संताप असून, या अन्याय्य मदतीच्या निषेधार्थ उद्या दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ व