पुणे शहर: पुण्यात सिंहगड रोडवर मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री सिंहगड रोडवरील पुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला रवाना झाले.याबाबत मराठा समाजातील काही आंदोलनकर्त्यांना माहिती होताच, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे,या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी मराठा समाजातील आंदोलनकर्ते कार्यक्रम स्थळी आले होते.त्यावेळी पुणे पोलिसांनी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.