बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे.शहरातील दरगाबेस परिसरात मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल महेश बिरुटे यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर शहरातील दर्गा बेस परिसरा एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली.