धारणी: धारणीत गंभीर जलसंकट; नगर पंचायत प्रशासनाकडे राजवीर जनहित संघटनेचे निवेदन
धारणीत अनेक वॉर्डांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित जलपुरवठा होत असून नागरिकांना गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज ८ ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता राजवीर जनहित संघटना धारणी तर्फे नगर पंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.राजवीर जनहित संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर पंचायत क्षेत्रातील वॉर्ड क्र. ७, ८, १२ आदी भागांमध्ये निश्चित वेळेस पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात किंवा....