जळगाव: पी.एन.गाळगीळ यांच्या दालनातून १ लाख ४०० हजारांची सोन्याची अंगठीची चोरी; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील रिंग रोडवरील पी.एन.गाळगीळ यांच्या दालनातून अज्ञात महिलेने १ लाख ४० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची धक्कादायक घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत शनिवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.